• Home
  • मराठी
  • NIVAANT, JAYATPAD
  • KINDRE WADA, BALAVADI
  • ALPAVIRAM, CHIKHALAVDE
  • PATEL FARMHOUSE, KAMSHET
  • TILAK WADA, SINHAGAD
  • SWAPNAPOORTI, CHAKAN
  • Ongoing works
  • FAQs
  • Publications
  • Contact Us
  • Workshops and training

वास्तू विशारद ध्रुवांग व प्रियांका



पर्यावरण पूरक, नैसर्गिक पद्धतीचे बांधकाम



कामाचे स्वरूप



आम्ही नैसर्गिक संसाधने वापरून पारंपारीक व स्थानिक बांधकाम पद्धतीत घरे बांधतो



आम्ही बांधलेली काही घरं



अधिक माहितीसाठी फोटोंवर क्लिक करा



कामाची संकल्पना





१



लोक



प्रत्येक ठिकाणची जशी स्थानिक लोकभाषा वेगळी असते, तसेच लोकवास्तूही वेगळी असते. एका ठिकाणाची पारंपारिक बांधकाम पद्धती तिथल्या हवामान व संस्कृतीशी निगडित असते. आजकाल असे पाहायला मिळते कि या वर्षानुवर्षे प्रगत झालेल्या पारंपारिक पद्धती झटकून तिच्या जागी, काही विचार न करता "आधुनिक तंत्रज्ञान" वापरले जाते.


या सर्व पारंपारिक पद्धती शेकडो वर्ष टिकून ठामपणे उभ्या आहेत. म्हणूनच आमचा असा विचार आहे कि नवीन बांधकाम करताना या वस्तूंचा अभ्यास करून प्रेरणा घेणे आवश्यक आहे.



२



नैसर्गिक



आजच्या जगात आपण रसायनांनी प्रदूषित झालेले अन्न, हवा, पाणी, वातावरण इ. या सर्वांबद्दल सजग होत आहोत. परंतु बांधकामाच्या क्षेत्रातही बरेच प्राणघातक रसायने आजकाल वापरली जातात, याचा बहुतांशी लोकांना पत्ता नसतो. "आधुनिक" समजले जाणारे बहुतांशी मटेरियल पर्यावरणासाठीच नव्हे तर कामगार व रहिवासी दोघांच्या स्वास्थ्याला हानिकारक असतात.


या उलट नैसर्गिक व पारंपरिक मटेरियल वापरून केलेली घरे आपले व पर्यावरणाचे स्वास्थ्य जपतात. फक्त नैसर्गिक मटेरियल नव्हे, तर कमीतकमी व नैसर्किट प्रक्रिया केलेले मटेरियल आम्ही बांधकामासाठी वापरतो.



३



स्थानिक



आम्ही बांधलेल्या घरातले सर्वाधिक मटेरियल व मनुष्यबळ शक्य तितके स्थानिक असते.


स्थानिक मटेरियल वापरल्यामुळे केवळ घराचं नव्हे तर बांधकामाची प्रक्रिया देखील पर्यावरणाला पूरक होते. ट्रान्सपोर्ट साठी विनाकारण इंधन जाळले जात नाही. यामुळे स्थानिक मटेरियल ने घरं बांधायला, सिमेंट च्या घरांपेक्षा कमी ऊर्जा लागते, असे म्हणता येईल.


स्थानिक मनुष्यबळ वापरल्याने गावात रोजगार निर्माण होऊन गावातले पैसे गावात राहतात. त्याबरोबर झपाट्याने बदलणाऱ्या बांधकामाच्या क्षेत्रात सुतार, लोहार, गवंडी, बेलदार इ. सारख्या पारंपरिक व्यवसायांनादेखील वाव मिळतो.



आमच्याशी संपर्क साधा





आर्किटेक्ट ध्रुवांग हिंगमिरे व प्रियांका गुंजीकर



पत्ता:
४, वृंदावन सोसायटी,
म्हात्रे पुलाजवळ,
पुणे - ४११०३०


ई-मेल: buildinginmud@gmail.com



फोटोग्राफी:
आर्किटेक्ट विक्रम हिंगमिरे
त्यांच्या वेबसाईटला भेट द्यायला इथे क्लिक करा.



Architects dhruvang and priyanka



4Vrindavan society, near mhatre bridge, pune - 411030


buildinginmud@gmail.com